//द ट्रॅफिक वडापाव

द ट्रॅफिक वडापाव

By |2020-02-22T14:40:49+00:00February 22nd, 2020|Inspiring Story|

मुंबई म्हटलं कि डोळ्यासमोर दोन गोष्टी येतातचं. पहिली म्हणजे मुंबईची गर्दी आणि दुसरी गोष्ट म्हणजे वडापाव. इथे येणारा प्रत्येक व्यक्ती त्याची-त्याची स्वप्ने घेऊन फिरत असतो. कोणी झोपेपणी तर कोणी जागेपणी उघड्या डोळ्यांनी. तर या स्वप्नांना Push On करण्याचं काम करतो तो म्हणजे मुंबईचा वडापाव. मुंबईकरांचा सकाळचा आणि संध्याकाळचा नाश्ता म्हणजे वडापाव. स्ट्रगलरांच तर दुपार आणि रात्रीचं जेवण सुध्दा वडापाव. गरिब असो वा श्रीमंत. बिजनेसमन असो वा चित्रपट कलाकार सगळ्यांनाच भुरळ पाडणारा आणि आपल्यात सामावून घेणारा असा हा वडापाव. मुंबईची गर्दी आणि वडापाव हे समिकरण तर छानपैकी जुळून आलयचं पण या समिकरणात गर्दी ही वडापाव पर्यंत जातीये. पण जर का याउलट झालं तर? म्हणजे आपण वडापाव पर्यंत न जाता वडापाव आपल्या पर्यंत आला तर?

Technosavy जगात राहून मी असा का बोलतोय असा प्रश्न तुम्हाला नक्कीच पडला असेल. अरे Online होतं आजकाल सगळं. Ping से लेके Pong तक आणि Ding से लेके Dong तक सगळं येत घरपोच. मग वडापाव काय चिज आहे. नक्कीच वडापाव चिझ नाहीये. वडापाव वडापाव आहे. माहीतीये फारचं nonsense joke आहे. पण मी online food delivery बद्दल नाही बोलत आहे. पण त्याहीपुढे जाऊन एका भन्नाट संकल्पनेबद्दल बोलतोय. संकल्पना म्हटल्यापेक्षा Business plan/Business Trick/ Business Strategies म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. आता तुमचा दुसरा प्रश्न हा असेल की online पेक्षाही अशी कोणती Business Trick आहे जी तुमच्या हातात वडापाव आणून देईल. तर मित्रांनो आणि मित्रांच्या मैत्रिणींनो online order केल्याने food तुमच्या घरापर्यंत येऊ शकेल पण ट्रॅफिक मध्ये फसला असाल तिथपर्यंत तर शक्यतो कमीच. फारच क्वचित. आता तुम्ही म्हणाल ट्रॅफिक मध्ये कोण आणेल वडापाव विकायला? आम्ही फक्त पेन-पेन्सिल, garbage bags, अश्या छोट्या-मोठ्या वस्तूच विकतांनी पाहिल्या. ट्रॅफिक मध्ये वडापाव!छे! आणि एवढा सगळा डोलारा मिरवत कुठे फिरणार वडापाव वाला.

तरमग आता मला सांगा मुंबई म्हटल्यावर गर्दी आलीच. आणि गर्दी म्हटल्यावर वाहतूक कोंडी ही सातवीला पुजल्यासारखी आलीच. आणि इथल्या वाहतूक कोंडीची गोष्ट तुम्हाला वेगळी सांगायला नको. दोन-अडीच तास तुमची संध्याकाळ Fuse उडालेल्या बल्ब सारखी होऊन जाते. आणि या दरम्यान तुम्हाला जर भुक लागली तर मग Option काय? ट्रॅफिक मधून समोर जाताही येत नाही आणि गाडीतून उतरताही येत नाही. रोज स्नॅक्स घेऊन फिरतो अशातलाही भाग नाही. प्रश्न जर भुकेचा असेल तर त्या प्रश्नावर उत्तर म्हणजे ‘द ट्रॅफिक वडापाव’. ठाण्यामधल्या तिन हात नाका फ्लायओव्हर सिग्नल जवळ जर तुम्ही वाहतूक कोंडीत अडकला असाल तर ‘ट्रॅफिक वडापाव’ तुमच्या भुकेची चिंता मिटवण्यासाठी सज्ज आहे.

ट्रॅफिक वडापाव नक्की काय आहे तर, हा एक Brand आहे जो ठाण्यातील ३० वर्षिय गौरव लोंढे यांनी आपल्या संकल्पनेतून सत्यात उतरवला. लोंढे हे अंधेरीला हॉटेल इंडस्ट्रीमध्ये स्टोअर मॅनेजर म्हणून कार्यरत होते. त्यावेळी बाईकवरुन अंधेरी ते ठाणे असा दोन-अडीच तासांचा प्रवास वेळखाऊ आणि कंटाळवाणा वाटायचा. भुक लागली कि खायला काहिच नसायचं. त्यात ट्रॅफिकमधून कुठे जाणार. तेव्हा त्यांच्या डोक्यात कल्पना जन्म घेत होती की, On the Road लोकांना खाता येईल असा व्यवसाय करायचा. यासाठी चांगल्या पगाराची नोकरी सोडून हा व्यवसाय करायचा म्हणजे एक प्रकारे रिस्कचं होती. पण ही रिस्क त्यांनी लिलया पेलली. बायको, आई, भाऊ, काका आणि स्वत: लोंढे यांनी ही कल्पना लोकांसमोर आणली. ही भन्नाट कल्पना काय आहे? कसा विकला जातो हा वडापाव आणि नेमकी काय खास गोष्ट आहे या वडापावमध्ये?

रिफाईन्ड तेलापासून हे होममेड वडे बनवले जातात. वडे जरी घरी बनत असतील पण त्यामध्ये वापरला जाणारा मसाला, बटाटे हे सगळे क्वालिटी बघूनच वापरतो. एकदा वापरलेलं तेल परत दुसऱ्या दिवशी वापरणार असला प्रकार ते कधी करत नाहीत. शिवाय आधल्या दिवशी उरलेले वडे परत दुसऱ्या दिवशी गरम करुनही ते लोकांना विकत नाही. ग्राहकांना दैवत माणून चालणारे गौरव यांच म्हणणं आहे ग्राहकांशी बेइमानी म्हणजे देवाशी बेइमानी.

या वडापावचं वैशिष्ट म्हणजे एका चौकोनी बाॅक्स मध्ये सिलव्हर कोटेड पाकिटात हा वडा पॅक केला जातो. ग्राहकांना गरमा-गरम वड्याचा आस्वाद घेता यावा यासाठी ही विशेष सिलव्हर कोटेड पॅकिट. त्याचबरोबर त्या बाॅक्समध्ये तुम्हाला मिळणार एक पाव, टोमॅटो केचप, सुकी चटणी, मिरची, टिश्यू पेपर, सोबतच एक छोटी पाणी बाॅटल ही तुम्हाला देण्यात येते. या अश्या सुदरश्या Box Of Happiness साठी तुम्हाला फक्त विस रुपये मोजावे लागतात. ठाण्याच्या तिन हात नाक्याच्या ट्रॅफिक मध्ये जर तुम्ही अडकला असाल. किंवा रोज त्या रस्त्याने जाण्या-येणाऱ्यांसाठी ट्रॅफिक वडापाव ही खास पर्वणी आहे. संध्याकाळी ६-१० दरम्यान तिथे खूप वाहतूक कोंडी असल्याने गौरव लोंढे आणि त्यांच्या टिमने ही वेळ निवडली आहे.  लाल कलरची टि-शर्ट घातलेली आणि त्यावर ट्रॅफिक वडापाव लिहीलेली मंडळी जर तुमच्या जवळ आलीय तर अजिबात घाबरु नका. ते तुम्हाला स्ट्रिट मध्येही भारी ट्रिट देणार आहेत. २०१९ च्या दिवाळीत सुरु केलेल्या या बिझनेसला पहिले तर फार कमी रिस्पाॅन्स आला. दिवसाला फक्त ४-५ वडापाव विकले जायचे. पण हळूहळू लोकांना हा प्रकार माहीती पडल्यावर लोकं आवर्जुन वडापाव घेत होते. त्यानंतर सोशल मिडियावर सुध्दा ट्रॅफिक वडापावची जोरात चर्चा झाली. या रस्त्यावरुन रोज कामाला जाणारे तर त्यांचे डेली कस्टमर्स झालेत. त्यांच्या Official Page आणि वेबसाईटला लोकांचा चांगल्या प्रकारचा Review येतो. दोन महिन्यातच दिवसाला त्यांच्या १००-१५० बाॅक्सेस सेल होतात.

दिवसभराच्या कामाचा त्रास, बाॅस च्या कमिटमेंट, Employees ची Recruitment, सतत येणारे Calls, Notifications चे Symbolls या सगळ्यांना वैतागला असाल तर हा ट्रॅफिक वडापाव तुम्हाला नक्कीच रिफ्रेश करेल. सध्या तरी या वडापावची दुसरीकडे कुठे Branch नाही. पण मॅनपावर वाढला तर आम्ही नक्कीच ठिकठिकाणी Branches ओपन करुन बेरोजगारांना रोजगार मिळवून देण्याचं काम ते करतील. ज्यांना कोणालाही ट्रॅफिक वडापाव बरोबर काम करण्याची इच्छा असेल त्यांनी वेबसाईटला Visit देऊन गौरव लोंढेंचा संपर्क मिळवून जॉईन होऊ शकता. खास करुन तरुणांसाठी ही चांगली संधी आहे. आणि नविन स्टार्टअप करु पाहणाऱ्यांसाठी ही प्रेरणा आहे.

आता तर नाईट लाईफ सुध्दा सुरु झालीये. संध्याकाळच्या मानाने रात्री ट्रॅफिक कमी असेल पण खवय्यांसाठी ट्रॅफिक वडापावची Branch नक्कीच उघडी असू शकेल. कारण जोपर्यंत तुमची स्वप्ने आहेत. वडापाव आहे. स्वप्नांचा पाठलाग करायला हा वडापाव मदत करेल. पण त्यासाठी तुम्हाला तिन हात नाक्याच्या ट्रॅफिक मध्ये अडकावं लागेल. मी काय म्हणतो, तसंही आपण रोज कुठल्या ना कुठल्या अस्वस्थतेत अडकतोच की, मग या Box Of Happiness साठी ट्रॅफिक मध्ये अडकलो तर काय हरकत आहे. कारण कधी-कधी कुठे अडकणं ही चांगलं असतं.

0

About the Author:

Leave A Comment