/, People/संवेदना

संवेदना

By |2020-02-05T14:18:32+00:00February 5th, 2020|Inspiring Story, People|

हे माणसा,
नेमकं काय लिहू किंवा तुला काय सांगू मला कळत नाहीये, पण सध्या तुझ्यावर भलमोठ संकट आहे. तुझा उघड्यावर पडलेला संसार, मुला-बाळांची झालेली वाताहत, मुक्या जनावरांचे हाल मला बघवत नाहीये. ज्या घरात तू तुझ्या बायलीसोबत नव्या संसाराला सुरवात केलीस…बारक्याच हसण- रडन अनुभवलस..म्हाताऱ्याची तिरडी सुद्धा ह्याच घरात बांधलीस, आता त्याचा घरात तुला गुडघाभर चिखलात तुला उभं राहावं लागतंय…ना आता तुझ्याकडे गैस आहे ना राशन…तीन दगडांची चूल तुला एकट्यालाच पेटवायची आहे, पण आता त्यातल्या एक दगड मात्र उडून गेला आहे..भिंतीवरील एकुलत्या एक लेकाचा फोटू हृदयाशी कवटाळून रडत बसण्याशिवाय तुझ्याकडे पर्याय नाहीये…
“पण मी कुठे काय केलंय..? ह्यात माझा काय दोष..?”
मला माहित होत तुझ हेच म्हणन असणार…अरे तू नाही पण तुझ्या आजूबाजूला रोजच्या रोज निसर्गाची होणारी दैना पाहत होतास नां…ते थांबवू शकला असतास. अरे तुझ्यापेक्षा ते NDRF चे सोल्जर बरे…सोल्जर कसले देवरूपीच ते..किमान ते लोकांना वाचवताना आपलं घरी कुणी वाट तर पाहत नाहीये नां, ह्याची साधी पर्वा सुद्धा करीत नाही.. जगणं-मरण हे कुणाच्याच हातात नसत..पण प्रयत्न करण चुकीच नाहीये नां… ज्या बोटमध्ये १७ लोकांची क्षमता होती त्यात ३० जणांना बसवून बोट पुढे पाठवली. नंतर झाला तो मोठा अपघात…आता ह्यात दोष नेमका कुणाचा..??
‘सरकारचा.. ज्यांनी वेळेत अधिक बोट्स पाठवल्या नाहीत..?
‘का त्या लोकांचा.. ज्यांना लवकर ह्या समस्येतून बाहेर पडायचे होते..??
‘कि त्या जवानांचा..ज्यांनी क्षमतेपेक्षा जास्त लोकांचा जीव वाचवण्याचा प्रयत्न केला….?
अरे माणसा..तू नेहमीच दुसऱ्याला दोषारोपण करण्यास तयार असतोस, पण स्वतःहून मात्र काहीच करीत नाहीस. या महापुरात कित्येकांच्या आयुष्याला शून्यापासून सुरवात झालीये, तर त्या शून्याला १०० पर्यंत पोहचवण्याच काम काही धाडसी लोकांनी केलंय. हे माणसा..तू तिकडे संकटात असताना तुझ्या मदतीला जिल्ह्यातील, राज्यातील वेगवेगळ्या सामाजिक संघटना, होतकरू तरुण, नाटकवाले, मिडीयावाले हे कसोशीने प्रयत्नास उतरले. हो आता त्यांनी दिलेली मदत हि तुझ्यापर्यंत पोहचली खरी, पण तुझ्या काही लोकांनी त्याच वेगळ्याप्रकारे ब्रांडीग करून ते श्रेय स्वताच्या नावावर खपवल..अश्या लोकांची जमात आजही जिवंत आहे आणि दर दिवसागणिक ती वाढतच जाणार…पण माणसा, ह्यात एक नवी गोष्ट मला पुनः एकदा कळली…ती म्हणजे “माणुसकी”. कितीही भांडलो, कितीही त्रागा केला तरी माणुसकी आजही जिवंत आहे असच म्हणावं लागेल. प्रसारमाध्यमंद्वारे तुझी बातमी देशाच्या कानाकोपऱ्यापर्यंत पोहचली आणि लाखोच्या संख्येने मदतीचे हात तुझ्यासमोर आले. कुणाच्या तरी एका निर्णयाने होत्याच नव्हत झालं आणि कुणाच्या एका विडीओने शून्याला प्रारंभ झाला.
आता लाखो बोटे उठतील विरोधक्कांची आक्रमण करण्यास…पुराची दयनीय अवस्था सदनीय करण्यापेक्षा त्यावर चवदार पोळी भाजण्यास त्यांना मज्जा येईल. पण तू हरून जाऊ नकोस..तुझ्या दुःखाच डोंगर हा तुला एकट्यालाच बाजूला सारून, हक्काचं छप्पर उभ करायचं आहे. तुझ्या लाडक्या धर्या अन सर्जाच्या जागेवर आता फक्त त्याच वेसण उरलं असेल…पण पुन्हा सज्ज व्हायला तुला शिकायचं आहे..तुझ शिक्षण जास्त नाहीये, माहितीय मला..पण ह्यो जीवनाचा गाडा पुन्हा चालवण्यासाठी पुस्तकी नाही तर अनुभवाची शिदोरी तुझ्यासोबत असलं…
तू हे पूर्ण करशील…स्वतःला सावरशील..पुन्हा एकदा सगळ सुरळीत चालू होईल…पण भविष्यात पुन्हा हे अस काही होणार नाही, ह्याची काळजी तू घेशील..विसरू नकोस ज्यांनी मदतीचे हात दिले, विसरू नकोस ज्यांनी तुझ्या दुःखाच मलम चाखले…वेळ येईल प्रत्येकाची..तेव्हा तू नॉन स्ट्राइकवर नसून तर ऑन स्ट्राइकवर उभा राहून बटिंग कर….तुझ्यामागे माझी कृपा सदैव आहे..यशस्वी हो…सुखी रहा..कल्याणम्

Writer: Kiran Raju Waghmare, Mumbai(8286751774)

#srijan #inspirational #motivational #inspitale

0

About the Author:

I m Freelancer Writer.

Leave A Comment

11 − 1 =