मनू
बालपणीतलं गाव म्हटलं कि आठवते ती शाळेला लागलेली उन्हाळी सुट्टी, कोकणकन्यातला प्रवास आणि महिनाभर तिथल्या हिरवळीत, तिथल्या मातीत घातलेला धुडगूस. साधारणपणे या वर्णनावरून तुम्हाला कळलंच असेल, कि मी कोकणातला आहे. अर्थात माझं गाव म्हणजे कोकणातल्या राजापूर तालुक्यातील लहानसा खेडेगाव - [...]